मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

ई- फेरफार प्रकल्पाच्या अंमलबजावणीत गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका महाराष्ट्रात अव्वल.

राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राज्यात सुरु करण्यांत आला असून सदर कार्यक्रमास राज्यात ई-महाभूमि- एकात्मिक भूमि अभिलेख आधुनिकीकरण आणि व्यवस्थापन कार्यक्रम या नावाने संबोधण्यांत येत आहे. ई-महाभूमि कार्यक्रम अंतर्गत खालीलप्रमाणे प्रकल्प कार्यान्वित करण्यांत येत आहे.

1. ई-मोजणी
2. ई- फेरफार
3. ई-चावडी
4. ई- अभिलेख
5. ई- नकाशा
6. ई- नोंदणी
7. ई- पुनर्मोजणी
8. ई- भुलेख

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या दिनांक 16.10.2012 रोजीच्या बैठकीत ई- फेरफार आज्ञावलींला मान्यता देण्यांत आली. त्यानुसार महसुल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक रा.भु.अ. 2013/प्र.क्र.32/ल-1 दिनांक 23.01.2013 अन्वये ई- फेरफार आज्ञावली राज्यभरात लागु करणेचा शासन निर्णय निर्गमित करण्यांत आला. सदर आज्ञावली स्टेट डाटा सेंटरवर मुंबई येथे कार्यान्वित (Host) करण्यांत आली.

ई- फेरफार प्रकल्पाअंतर्गत संगणकीकृत सातबाराच्या डेटाचे अद्यावतीकरण करणे, युनिकोडमध्ये रुपांतरण करणे, तालुका स्तरावरील महसूल कार्यालयांची समांतर जोडणी करणे व दुय्यम निबंधक कार्यालयांची महसूल कार्यालयांशी जोडणी करणे या बाबी एकत्रित करुन राज्यात ई- फेरफार प्रक्रीया सुरु करण्यांत येणार होती.

जिल्ह्यात सर्वप्रथम ऑनलाईन फेरफार (ई- फेरफार) प्रणाली कार्यान्वित करणेकरीता चामोर्शी उपविभागातील मुलचेरा तालुक्याची निवड करण्यांत आली. सदर प्रणालीची योग्य अंमलबजावणी करणेकरीता आवश्यक पुर्वतयारी करणेची कार्यवाही तालुका, उपविभाग व जिल्हास्तरावरुन करण्यांत आली. पुर्वतयारी करीता आवश्यक कार्यवाही पुर्ण केल्यानंतर अद्यावत डाटा सिडी माहे ऑगष्ट 2014 रोजी State Data Centre वर अपलोड करणेकरीता पाठविण्यांत आली. अपलोड केलेल्या डाटा चे सहाय्याने ट्रायल रनची कार्यवाही करण्यांत आली

वर नमुद केल्याप्रमाणे कार्यवाही पुर्ण करण्यांत आल्यानंतर ई- फेरफार आज्ञावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिनांक 20 ऑक्टोंबर 2014 पासुन करण्यांत आली. मुलचेरा तालुक्यातील मौजा कालीनगर येथील खातेदार श्री. बादल सरकार यांचा मृत्यु झाल्याने, वारस फेरफार क्र. 314 ऑनलाईन पध्दतीने घेण्यांत आले असुन ऑनलाईन पध्दतीने तयार झालेली नमुना 6 व नमुना 9 ची नोटीस तयार करण्यांत आली आहे. सदर नोटीस खालील लिंकवर माहितीकरीता उपलब्ध करुन देण्यांत येत आहे.

1. नमुना 6 ची ऑनलाईन नोटीस.
2. नमुना 9 ची ऑनलाईन नोटीस.