मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासकीय विभाग व रचना

गडचिरोली जिल्ह्याचे मुख्यालय गडचिरोली येथे असून जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या नागपुर विभागात मोडतो. हा जिल्हा विदर्भ या भागात येतो. जिल्हाधिकारी कार्यालय हे गडचिरोली शहरापासून ४ कि.मी. अंतरावर चंद्रपूर मार्गावर वसलेले आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १४४१२ चौ.कि.मी. आहे.

गडचिरोली जिल्हा हा प्रशासकीय दृष्ट्या एकूण सहा उपविभागात विभागलेला आहे. गडचिरोली, देसाईगंज (वडसा), अहेरी, कुरखेडा, चामोर्शी, एटापल्ली हे जिल्ह्याचे सहा उपविभाग असून प्रत्येक उपविभागात दोन तालुके समाविष्ट केलेले आहेत.

जिल्ह्यातील उपविभाग व त्याची नावे

अ.क्र. उपविभागाचे नाव समाविष्ट तालुक्याची नावे
गडचिरोली गडचिरोली, धानोरा
चामोर्शी चामोर्शी, मुलचेरा
अहेरी अहेरी, सिरोंचा
एटापल्ली एटापल्ली, भामरागड
देसाईगंज (वडसा) देसाईगंज, आरमोरी
कुरखेडा कुरखेडा, कोरची

जिल्ह्यातील उपविभाग, तालुके व तालुकानिहाय एकूण समाविष्ट गावे

अ. क्र. उपविभागाचे नाव विभागातील तालुके तालुकानिहाय एकूण गावे एकूण समाविष्ट मंडळ एकूण समाविष्ट साजे
गडचिरोली १. गडचिरोली

१२८

२४

    २. धानोरा

२२८

२३

चामोर्शी १. चामोर्शी

२०४

३३

    २. मुलचेरा

६८

देसाईगंज (वडसा) १. देसाईगंज

३९

१३

    २. आरमोरी

१०३

२०

कुरखेडा १.कुरखेडा

१२८

१८

    २. कोरची

१३३

१७

अहेरी १. अहेरी

१८४

२२

    २. सिरोंचा

१४८

२३

एटापल्ली १. एटापल्ली

१९७

२२

    २. भामरागड

१२८

१०

  एकूण एकूण तालुके - १२

१६८८

४०

२३३

जिल्ह्यात एकूण १६८८ राजस्व गावे असून ४५७ ग्राम पंचायती, १२ पंचायत समीती व एक जिल्हा परीषद आहे. जिल्ह्यात १० नगर पंचायती (आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड) असून दोन नगरपालिका गडचिरोली व देसाईगंज (वडसा) येथे आहेत.

 

Valid XHTML 1.0 Transitional

Valid CSS!

|मुख्य पृष्ठ |

|साईटमॅप |

|अस्वीकृती आणि धोरणे |

|मदत |

|संपर्क करा |

शेवटचा बदल 19/07/2016

© वेबसाइट निर्मिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गडचिरोली